फुटबॉल सामने पाहण्यासाठी परवानगी देण्याची फुटबॉलशौकिनांची मागणी

Spread the love

• पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी यांना निवेदन
कोल्हापूर • प्रतिनिधी
       कोल्हापुरातील फुटबॉल संघ व असंख्य फुटबॉलशौकीन यांना छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. याबाबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना ईमलव्दारे निवेदन पाठविण्यात आले आहे.
       फुटबॉलशौकीनांना फुटबॉल सामने पाहण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत करण्यात आलेल्या मागणीसंदर्भात कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, युवराज पाटील, शिवतेज खराडे, चंद्रकांत सूर्यवंशी, विनोद डुणूंग, लहुजी शिंदे, रोहित आळवेकर, अमित पोवार, विजय सुतार, बाजीराव तावडे, साईनाथ मोरे, किशोर डवंग, रुपेश रोडे आदींनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हातील कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव आणि रुग्ण संख्या अतिशय सौम्य परिस्थितीत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा व शहराचा श्वास असणारा खेळ म्हणजे फुटबॉल. या खेळाच्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपण परवानगी देवून खेळाडूंना व क्रीडाशौकीनांना आनंद घेण्याची पर्वणी उपलब्ध करून दिली. क्रीडाशौकीनांनी ऑनलाईन स्पर्धा पाहून आणि खेळाडूंनी प्रशासनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन केले.
      आता कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन मार्फत मंगळवार दि.२२ फेब्रुवारी २०२२ पासून केएसए लिग फुटबॉल स्पर्धा सुरु होत आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेतील सामन्यात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच लिग फुटबॉल स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनला कोरोनाचे नियम पाळून मैदानावर ५० टक्के फुटबॉलशौकिनांची उपस्थिती ठेवण्यासाठी आपल्या स्तरावर लेखी अथवा तोंडी सूचना देवून सर्व फुटबॉलशौकिनांचे गेले २ वर्ष मैदानावर उपस्थित राहून सामना पाहण्याचे व आनंद लुटण्याचे खंडीत झालेले स्वप्न आपल्या स्तरावर योग्य ते आदेश देवून पूर्ण करून सर्व फुटबॉलशौकिनांची इच्छा पूर्ण करावी व खेळाचा आनंद द्विगुणित करावा हि विनंती.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!