कोल्हापूर • प्रतिनिधी
हिरो नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप फॉर संतोष ट्रॉफीसाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा)च्यावतीने महाराष्ट्र राज्य पुरूष फुटबॉल संघ निवड चाचणी शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी केएसएच्यावतीने २१ ऑक्टोबरला निवड चाचणी होणार आहे.
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्यावतीने हिरो नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप फॉर संतोष ट्रॉफी, २१नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघासाठी विफाच्यावतीने २३ ऑक्टोबरपासून कुपरेज फुटबॉल ग्राऊंड येथे निवड चाचणी शिबीर होईल. या निवड चाचणी शिबीरासाठी केएसएच्यावतीने मुंबई येथे सात मुले (खेळाडू) पाठविण्यात येणार आहेत. त्यामध्ये २१ वर्षाखालील दोन व खुल्या वयोगटातील पाच मुलांचा समावेश आहे. २१ वर्षाखालील खेळाडूंचा जन्म २००२चा किंवा त्यानंतरचा असला पाहिजे.
याकरिता केएसएच्यावतीने २१ ऑक्टोबर रोजी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. विफाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या निवड चाचणीसाठी १८ वर्षे पूर्ण असलेल्या व ज्या पुरूष खेळाडूंचे कोविड-१९ च्या लसीकरणारचे दोन्ही डोस पूर्ण झालेले प्रमाणपत्र आहे, अशा खेळाडूंनी गुरूवारी (दि.२१) सकाळी ७:३० वाजता फुटबॉल किटवर छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे उपस्थित रहावे, असे केएसएच्यावतीने कळविण्यात आले आहे.
खेळाडूंनी निवड चाचणीला येताना खालीलप्रमाणे ओरिजनल कागदपत्रे आणावीत.
• जन्म दाखला (नगरपालिका अधिकारी/जन्म निबंधक यांचा) यामध्ये एका वर्षाच्या आतील जन्म नोंद असणे आवश्यक आहे.
• आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड यापैकी एक आयडी प्रुप.
• पासपोर्ट साईज दोन फोटो.
• २१ वर्षाखालील खेळाडूंचा जन्म २००२ चा किंवा त्यानंतरचा असला पाहिजे.
——————————————————-