भारतातील बुध्दिबळपटूंसाठी कोविड चेकमेटद्वारे आर्थिक मदत

• महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेने नेमला टास्क फोर्स
कोल्हापूर • प्रतिनिधी
      अखिल भारतीय बुध्दिबळ संघटना अर्थातच एआयसीएफने भारतातील बुद्धिबळ खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, पंच व स्नेहीसाठी कोविड चेकमेट हे दालन उघडले असून त्याद्वारे ते कोविड-१९ रुग्णांना आर्थिक सहाय्य सोबत समुपदेशनाद्वारे बरे करण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे.
     महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ मयूर व ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी यात सहभागी होऊन पुढाकार घेऊन सोळा लाख रुपयांची मदतसुध्दा  एआयसीएफला केली असून डॉक्टरांचे पॅनलसुध्दा दिलेले आहे.
       महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेद्वारा  विभागवार कृती दलाचे सदस्य…..
• सिध्दार्थ मयूर (पुणे) पूर्ण महाराष्ट्र राज्याचे मुख्य नोडल कॉर्डिनेटर
• निरंजन गोडबोले (पुणे) बुद्धिबळ संघटनेचे कॉर्डिनेटर
• मनीष मारुलकर (कोल्हापूर) पश्चिम  महाराष्ट्र
• फारुक शेख (जळगाव) खानदेश
• अंकुश रक्ताडे (बुलढाणा) विदर्भ
• हेमेंद्र पटेल (औरंगाबाद) मराठवाडा
• विलास म्हात्रे (रायगड) कोकण
• विवेक सोहनी (रत्नागिरी) कोकण
• निनाद पेडणेकर (पालघर) मुंबई
      महाराष्ट्र राज्यातील बुध्दिबळ खेळाशी संबंधितास कोविडमुळे दवाखान्यात ॲडमिट होण्याची वेळ आल्यास त्यांनी त्वरित आपल्या विभागातील कृतीदल प्रमुखाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले व ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी  पत्रकाद्वारे केले आहे.
———————————————– Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *