श्री अंबाबाई मंदिराच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणार : नाम.एकनाथ शिंदे

Spread the love


  कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिवसेना नेते व महाराष्ट्र राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. श्री अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून, स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचे नमूद करीत श्री अंबाबाई मंदिराच्या डागडुजी व  दुरुस्तीसाठी तातडीने निधीची तरतूद करू, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव देवस्थान समितीला सादर करण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
      राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  यांनी श्री अंबाबाई मंदिरात आले. श्री अंबाबाई देवीच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी मंदिराची पाहणी केली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर असून, पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित रु.८० कोटींच्या निधी पैकी फक्त रु.९ कोटी रुपये निधी मिळाल्याचे सांगत उर्वरित निधी लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती केली. यासह मंदिराच्या दगडी बांधकामाच्या छतावरील गळती रोखण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धतीने ५ फुट थराचा १ हजार टन वजनाचा सिमेंटचा कोबा केले आहे. शिवाय झाडांची मुळे मंदिर बांधणीचे नुकसान करीत आहेत. ही स्थिती आता अंत्यंत धोकादायक वळणावर असून, तातडीने हा कोबा काढणे गरजेचे असल्याची माहिती दिली.
     यावर बोलताना नाम..एकनाथ शिंदे यांनी, महाराष्ट्र राज्य शासनाने पुरातन मंदिरांच्या विकासाचा व देखरेखीचा अधिकार नगरविकास खात्याकडे दिला असून, नगरविकास मंत्री या नात्याने श्री अंबाबाई मंदिरात होणाऱ्या दुरुस्तीस आवश्यक परवानगीची आणि लागणाऱ्या निधीची जबाबदारी घेत असल्याचे सांगत. मंदिरात झालेल्या पडझडीची किंवा कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीचा प्रस्ताव देवस्थान समितीने तातडीने सादर करावा त्यास निधी देवून मंदिराची पडझड तात्काळ थांबवू, अशी ग्वाही दिली.
     यावेळी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!