गोव्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केले आमदार जयश्री जाधव यांचे अभिनंदन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कोल्हापूर उत्तरच्या नुतन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचे अभिनंदन केले.
      गोवा येथे एका विवाह समारंभात लक्ष्मीकांत पार्सेकर व आ. जयश्री जाधव यांची भेट झाली. यावेळी पार्सेकर यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीची माहिती घेतली.
      पार्सेकर म्हणाले, कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्यावर तुम्ही निवडणुकीला सामोरे गेलात. कोल्हापूरच्या जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही आमदार झाला, याबद्दल तुमचे अभिनंदन. शहरातील विकासकामे गतीने पूर्ण करून कोल्हापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करा, अशा शुभेच्छा यावेळी दिल्या.
       याप्रसंगी शांभवी पार्सेकर, सत्यजित जाधव, देव सावंत, प्रेमेला जाधव, डॉ. दश्मिता जाधव आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!