कोल्हापूर • प्रतिनिधी
राधानगरी येथील कै.रेवताबाई दत्तात्रय एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने घेण्यात आलेल्या किल्ला बांधणी स्पर्धेत गौरव डवर(डवरवाडी) याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. स्पर्धेत २५ स्पर्धक सहभागी झाले होते.
अभिराज सचिन डवर (डवरवाडी) याने विशाळगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. त्यास द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक अनिकेत पाटील (फराळे) यांस मिळाला. त्याने पन्हाळगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. तसेच करण डवर (चतुर्थ क्रमांक)ने प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली. फराळे येथील उदय पाटील यांच्या रायगड किल्ल्यास पाचवा क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ बक्षीस विरसेन माने(फराळे)यांना मिळाले.
स्पर्धेत २५ स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेतील किल्ल्यावर किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती दर्शविण्यात आली होती. मुलांच्या सृजनशीलतेला, निर्मिती क्षमतेला व बुद्धीमतेला वाव मिळावा म्हणून गेली १६ वर्षे स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. किल्ला बांधणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जागा होतो. प्रत्येकाने आपल्या कलेनुसार सिंधुदुर्ग, लोहगड, विशाळगड, प्रतापगड, रायगड, तोरणा किल्ला अशा विविध किल्ल्यांची उभारणी केली होती.
स्पर्धेचे आयोजन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद एकावडे, प्रणित एकावडे व प्रसाद एकावडे यांनी केले. स्पर्धेतील किल्ल्यांचे परीक्षण मधुकर मुसळे व रामचंद्र चौगले(कुडूत्री) यांनी केले.