जोतिबा डोंगरावरील किल्ला स्पर्धेमध्ये पद्मदुर्ग प्रतिकृती प्रथम


कोल्हापूर • प्रतिनिधी
    किल्ले संवर्धनासाठी चळवळ उभी राहावी, छत्रपतींचा वारसा जपला जावा तसेच लहान मुले – मुली या संगणकीय मोबाईल युगामध्ये अडकून न पडता आपली परंपरा टिकावी म्हणून जोतिबा डोंगरावर प्रथमच  किल्ले स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आदिशक्ती प्रतिष्ठान शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचने बनविलेल्या ” किल्ले पद्मदुर्ग ” च्या प्रतिकृतीस प्रथम क्रमांक मिळाला.
     स्पर्धेत १५ संघांनी सहभाग नोंदवला. येथील बाल मावळ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने किल्ले प्रतिकृती बनवल्या होत्या. त्यामध्ये कॉर्नर बॉईज दक्षिण दरवाजा यांचा किल्ले जंजिरा द्वितीय तर प्रवीण स्पोर्ट्सच्या किल्ले प्रतापगड प्रतिकृतीस तृतीय क्रमांक मिळाला. सूर्यभान ढोली व ढोली ग्रुप किल्ले सुवर्णदुर्ग यांना प्रोत्साहनपर तसेच नवीन वसाहत मित्र मंडळ गणेश घडेल यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. कु.मान्यता बुणे यांनी, श्रुती बुणे व सनी कचरे यांनाही विशेष गौरविण्यात आले.
     बक्षीस समारंभप्रसंगी धनंजय उपारी व यशवंत चौगुले यांनी शौर्यगीते सादर केली. सुर्यभान ढोली, रूद्र बुणे, आर्या शिंदे, श्रृती बुणे यांनी शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी वैष्णवी ढोली व श्रुती बुणे या मुलींनी दिवाळीमध्ये किल्ला का बनवायचा या विषयावर मनोगत व्यक्त केले .
    कार्यक्रमासाठी सरपंच सौ. राधाताई बुणे,कोल्हापूर जिल्हा शिवसेना युवा सेना संघटक हर्षल सुर्वे, आरटीओ निरीक्षक निलेश ठोंबरे, मुंबई पोलीस क्राइम ब्रँचचे संग्रामसिंह कांबळे,  इतिहास अभ्यासक अमित अडसूळे , अवधूत कणसे , शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचचे अध्यक्ष सुरज ढोली, कृष्णात बुणे आदी उपस्थित होते.
     किल्ला स्पर्धेचे नियोजन सुरज ढोली, विनोद ढोली, दिग्विजय उपारी, कृष्णात बुणे, सोमनाथ ढोली, सूरज
बुणे, दीपक ढोली, मयूर दादर्णे, ओंकार ठाकरे, दीपक बुणे, राज बुणे, सोमनाथ ढोली यांच्यासह शंभुराजे मंच व धर्मवीर तरूण मंडळ  सदस्यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *