म्हाकवेत वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत

Spread the love


     
• मंत्री मुश्रीफ यांच्याकडून एनडीआरएफचा धनादेश प्रदान
कोल्हापूर • प्रतिनिधी
     महापुरात वाहून गेलेल्या म्हाकवे (ता. कागल) येथील सचिन जयराम पाटील या तरुणाच्या कुटुंबियांना चार लाखांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. एनडीआरएफचा मदतीचा धनादेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कुटुंबियांकडे दिला.
      याबाबत अधिक माहिती अशी, आठवड्यापूर्वी ओढ्याच्या पुराच्या पाण्यातून वाहून जाऊन सचिनचा मृत्यू झाला होता.  कर्त्या युवकांचा दुदैवी मृत्यू झाल्याने या कुटुंबियांवर संकट ओढविले आहे.
     या मदतीबरोबरच शासनाकडून पाच लाखांची मदत, कंपनीकडूनही या कुटुंबियांला भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
     यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, माजी पं. स. सदस्य ए. वाय. पाटील, सरपंच सौ. सुनिता चौगुले, उपसरपंच धनंजय पाटील, रमेश पाटील, सिद्राम गंगाधरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!