कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठाच्या ४ प्राध्यापकांना जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळाले आहे. एडी सायंटिफिक इंडेक्स या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून जगातील नामांकित शास्त्रज्ञांची यादी गुगल स्कॉलरचा आधार घेऊन जाहीर केली आहे. यामध्ये संशोधन आधारित विविध निकष लावून ही क्रमवारी ठरविली आहे.
संजय घोडावत विद्यापीठाकडून रसायनशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.एस.आर.पाटील, एरोनॉटिक्स इंजिनीरिंग विभागाचे प्रमुख डॉ.एस.व्ही.खंडाल, फार्मसी विभागाचे प्रा.डॉ.विश्वजीत घोरपडे, आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.निलेश बहादुरे यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एन.के.पाटील, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संजय घोडावत विद्यापीठविषयी थोडक्यात माहिती…..
संजय घोडावत विद्यापीठाची स्थापना २०१७ साली झाली आणि अवघ्या ५ वर्षांमध्ये विद्यापीठाने आपले जागतिक स्तरावर स्थान निर्माण केले आहे. विद्यापीठामार्फत प्रामुख्याने लिबरल आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी,आर्किटेक्चर, फार्मसी, कॉम्प्युटर अप्लिकेशन या विभागांतर्गत अभ्यासक्रम सुरु आहेत व यामध्ये विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पी.एच.डी पर्यंत पदवी धारण करण्याची संधी उपलब्ध आहे. संशोधन व नाविन्यता यावर जोर देण्यासाठी जागतिक स्तरावरील शिक्षण पद्धती व संस्कृती जपण्याचे कार्य हे विद्यापीठ करीत आहे. विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्तम असणाऱ्या मातब्बरांना आणि तज्ञांना आकर्षित केले आहे आणि या उद्देशासाठी त्यांना जागतिक दर्जाची आधारभूत संरचना पुरविली आहे.
विद्यापीठात संशोधन आधारित अध्यापनावर भर दिला जातो. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता , सृजनशीलता, कलागुणकौशल्य, तांत्रिक कौशल्ये व व्यावसायिक अभिवृत्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. अखंडता, पारदर्शकता, जबाबदारी, समानता, गुणवत्ता, सहानुभूती आणि कारभार या मूल्यांच्या आधारावर राष्ट्रासाठी भविष्यातील एक सक्षम नागरिक बनविण्यासाठी हे विद्यापीठ प्रयत्न करीत आहेत.
विद्यापीठाला आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विद्यापीठाला याआधी आय एस ओ ९००१:२०१५ व २१००१:२०१८ मानांकन प्राप्त झाले आहे. एकाचवेळी दोन्ही मानांकन मिळविणारे संजय घोडावत विद्यापीठ हे भारतातील पहिलेच विद्यापीठ आहे.
———————————————–
Attachments area