प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या चार व्यापाऱ्यांना २० हजार रुपये दंड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या चार व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करुन २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
     केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकॉल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत मंगळवारी लक्ष्मीपुरी येथील पटेल ट्रेडर्स, आरती प्लॅस्टिक, रमेश निरंकारी, पूजा प्लॅस्टिक यांच्यावर प्लास्टिकविरोधी पथकाने कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाद्वार रोड परिसरात जनजागृती करण्यात आली.
     ही कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे, उप-आयुक्त रविकांत आडसूळ व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, माहिती व शिक्षण संवाद अधिकारी निलेश पोतदार, आरोग्य निरीक्षक ऋषीकेश सरनाई, स्वप्नील उपले व कर्मचारी यांनी केली.    
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!