कोल्हापूर • प्रतिनिधी
स्वर्गीय सुधीर निजाम जाधव यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त चोकाक येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आस्था मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हातकणंगले तसेच मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर-नॅब आय हॉस्पिटल, मिरज व रक्तदान शिबीर- महात्मा गांधी ब्लड बँक पारगाव यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे आयोजन नितीन जाधव सोशल वेल्फेअर फौंडेशन यांच्यावतीने मोफत करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन संजय घोडावत पॉलीटेक्नीकचे प्राचार्य विराट गिरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहितदादा पाटील, माजी आमदार राजीव आवळे, प्रथम लोकनियुक्त सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच मनीषा कुंभार, आरोग्य अधिकारी डॉ.अस्मिता ढवळे, आरोग्यदूत अरविंद लोहार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रा.नितीन जाधव म्हणाले की, आपल्या घरातील व्यक्ती विशेषतः स्त्रिया ह्या आपले दुखणे अंगावर काढून कामाचा गाडा पुढे नेत असतात. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुढे गंभीर आजार उद्भवू शकतो म्हणून या समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून माझ्या वडिल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या शिबिराचे आयोजन केले आहे.
या आरोग्य शिबीरासाठी श्रीमती मंगल जाधव यांनी पुढाकार घेत ग्रामीण भागातील महिलांना शिबिराचे महत्व पटवून देत जास्तीत जास्त वयोवृद्ध महिला व पुरुष यांना सहभागी करून घेतले. या शिबिरामध्ये जवळपास ५२ हुन अधिकांनी रक्तदान केले. त्यांना जाधव फौंडेशन कडून सरंक्षण कवच म्हणून हेल्मेट प्रदान करण्यात आले. या शिबिरामध्ये १०० हुन अधिक लोकांनी नेत्रतपासणी केली. आणि २०० हुन अधिकांनी जनरल हेल्थ चेकअप करून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश पाटील व आभार रोहित तांदळे यांनी मानले.
——————————————————-