कोल्हापूर • प्रतिनिधी
श्री नेताजी तरूण मंडळच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त महिलांसाठी, लहान मुलांसाठी व सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १८ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीमेचे आयोजन केले आहे. श्री नेताजी तरूण मंडळ, सरदार तालीम जवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर याठिकाणी होणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिर व लसीकरण मोहिमेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे यांनी केले आहे.
श्री नेताजी तरूण मंडळ आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन, तपासणी, प्रथमोपचार व मोफत औषधे देण्यात येणार आहेत. आरोग्य तपासणी शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.योगिता भिसे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.प्रिया वाघ व बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रकाश कंडरे उपस्थित राहणार आहेत. आरोग्य तपासणी शिबिर दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल.
कोरोनावर मात करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे अत्यावश्यक आहे. तरी सर्व नागरिकांना सहजपणे लस मिळावी म्हणून श्री नेताजी तरुण मंडळाच्यावतीने दोनवेळा लसीकरण मोहीम घेण्यात आली.आता सलग तिसरी मोफत लसीकरण मोहीम आयोजित केली आहे. १८ वर्षावरील नागरिकांसाठी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस तर ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस मोफत उपलब्ध आहे. लसीकरणासाठी आधार कार्ड आवश्यक असून लसीकरण मोहीम १८ व १९ डिसेंबर रोजी होईल. अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे (मो.नं.९८६०६१९४०४), सेक्रेटरी राजेंद्र राऊत (मो.नं.७३५००६३९३९) व खजानीस प्रदीप साळोखे (मो.नं.९८६०६१०००७) यांच्याशी संपर्क साधावा.
——————————————————-