शुक्रवार-शनिवारी झी मराठीवर “हे तर काहीच नाय!”

Spread the love

• विशेष अतिथी सिध्दार्थ जाधव तर अक्षया देवधर सूत्रसंचालक
कोल्हापूर • प्रतिनिधी
      झी मराठीवर १० डिसेंबरपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९:३० वाजता अतरंगी किस्स्यांची मैफिल रंगणार “हे तर काहीच नाय!” याचे विशेष अतिथी म्हणून सिद्धार्थ जाधव तर अक्षया देवधर प्रथमच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे.
      २२ वर्षे झी मराठी वाहिनी जगभरातील मराठी माणसांचे मनोरंजन करत आलेली आहे. झी मराठीने नेहमीच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील गोष्टी, कथा, परंपरा, संस्कृतीचा ठसा जगभरातील मराठी मनावर उमटवलेला आहे. झी चित्र गौरवच्या माध्यमातून चित्रपटांचा तर नाट्य गौरवच्या माध्यमातून नाटकांचा सन्मान झी मराठी गेली कित्येक वर्ष करत आलेली आहे.
      महाराष्ट्राला विनोदी पात्र साकारण्याची परंपरा खूप मोठी आहे. अगदी संत एकनाथ महाराजांच्या भारूडापासून ते बुरगुंडा पर्यंत, किंवा प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे ते वऱ्हाडकार डॉ.लक्ष्मण देशपांडे पर्यंत. पण आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी अशा एकपात्री व्यक्तिरेखा साकारत असतात जसे की चौकात, नाक्यावर, कट्यावर, चहाच्या टपरीवर, मित्रांसोबत, समारंभात आणि ह्या गोष्टी अगदी मसाला लावून रंगवून सांगितल्या जातात.
      अशाच काही सेलेब्रिटींच्या आयुष्यातील गोष्टी ज्या सामान्य लोकांना माहिती नाहीत अशा गोष्टींच्या किस्स्यांचा फड झी मराठी वर रंगणार आहे. व्हॅनिटीतील, नाटकाच्या विंगेतील, नाटक सिनेमाच्या गल्ल्यापासून ते लग्नापर्यंत ..
      अश्याच अतरंगी किस्स्यांची मैफिल रंगणार झी मराठीवर ज्यामध्ये विशेष अतिथी म्हणून असतील सिद्धार्थ जाधव आणि सैराट फेम तानाजी गलगुंड आणि त्याचसोबत तुझ्यात जीव रंगला फेम पाठक बाई अर्थात अक्षया देवधर प्रथमच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सोबतच अनेक सरप्राइझेस या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतील

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!