१०२ नागरीकांच्याकडून ५६ हजार रुपये दंड वसूल

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहरामध्ये विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने व दुकाने सुरु ठेवण्याऱ्यां १०२ नागरीक व व्यापाऱ्यांकडून ५६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून हा  दंड वसूल करण्यात आला.
     कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. शासनाने व जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कोरोना संदर्भातील नियमांचे पालन काही ठिकाणी होत नाही. शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबद्दल रविवारी (दि.१८)  महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क १०० लोकांकडून ५००००, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने एका नागरिकाकडून १००० व रात्री ९ नंतर दुकान सुरु ठेवलेल्या एका दुकानदाराकडून ५००० असे एकूण ५६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
     शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सण, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!