कोल्हापूर • प्रतिनिधी
महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रात सोमवार दि.२६ एप्रिलपासून कोविशिल्डच्या फक्त दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे.
महापालिकेस दि.२५ एप्रिल २०२१ रोजी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी शासनाकडून लससाठा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे महापालिका उद्यापासून सर्व केंद्रावर कोविशिल्ड लसीकरणाचा दुसरा डोस देणार आहे. दि.५ मार्च ते १६ मार्च २०२१ अखेर कोवीशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या एकूण १२९३५ इतके लाभार्थी आहेत. दि.१५ एप्रिल ते २४ एप्रिल २०२१ अखेर कोविशिल्डचा दुसरा डोस घेतलेले ३९०० इतके लाभार्थी आहेत. त्यामुळे महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या लसीकरणानुसार कोविशिल्डचा पहिला डोस ज्या नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतला आहे व दि.२६ एप्रिल रोजी ज्यांना सहा आठवडे पुर्ण झालेले आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेण्याकरीता संबंधीत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये जावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी Cowin Portal वर ऑनलाईन रजिस्टेशन केले आहे. फक्त त्यांनीच प्राथमिक नागरी आरोग्य केद्राकडे लसीकरणासाठी यावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आ