फ्रंन्टलाईन कर्मचारी, दुकानदार व भाजी विक्रेत्यांचे लसीकरण व टेस्टिंग पुर्ण करा: प्रशासक डॉ. बलकवडे


कोल्हापूर • प्रतिनिधी
    शहरातील फ्रंन्टलाईन कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक बाबींसाठी सुरु राहणाऱ्या दुकानदारांचे, भाजी विक्रेत्यांचे लसीकरण व टेस्टिंग तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी रविवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सर्व अधिकाऱ्यांची कोरोना नियोजनाबाबत आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी कोवीड केअर सेंटर सुरु करण्यापुर्वी त्याठिकाणचे इलेक्ट्रीक व फायरचे ऑडीट तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना शहर अभियंता व मुख्य अग्निशमन अधिकारी यांना दिल्या.
    अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई,  इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, प्रशासन अधिकारी शंकर यादव, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार व मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले यांनी कोवीडसंदर्भाने आपापल्या विभागाने केलेल्या तयारीचा आढावा या बैठकीत सांगितला.
     प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करुन दिलेली आहे. दुकानदारांचे व कामासाठी ये – जा करणाऱ्यां सर्वांचे टेस्टिंग व लसीकरण महत्वाचे आहे. ते प्राधान्याने पूर्ण करुन घ्या. सर्व दुकानांमध्ये असणाऱ्यां कर्मचाऱ्यांचेही टेस्टिंग व लसीकरण करणे आवश्यक आहे. केएमटीकडील ड्रायव्हर व कर्मचाऱ्यांचे लसीकरण १०० टक्के झाले असल्याबाबतचा सहा.आयुक्तांनी अहवाल द्यावा. खाजगी वाहतूक करणाऱ्या नागरीकांचेही तपासणी करुन घ्या. यासाठी पथक नेमा. विविध पथकात काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांस काय त्रास होत असल्यास तातडीने त्यांचे टेस्टिंग करुन घ्या. स्वत:ची काळजी घेऊन आपल्याला शहरासाठी काम करावयाचे आहे. कोवीड केअर सेंटरसाठी जे काही साहित्य लागणार आहे. ते नियमाप्रमाणे तातडीने खरेदी करा. हॉस्पीटलचे व कोवीड केअर सेंटरचे सेंटर सुरु होण्यापुर्वी ऑडीट करुन त्याच्या काही तक्रारी असतील तर त्या पुर्ण करुन घ्या अशा सुचना दिल्या.
     यावेळी उप आयुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जल अभियंता नारायण भोसले, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे, अतिक्रमण पथक प्रमुख पंडीत पोवार, आरोग्य निरिक्षक गीता लखन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *