इंडियन ऑईल कार्पोरेशनकडून केएमटी चालकांना इंधन बचतीचे मार्गदर्शन  

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       कोल्हापूर महानगरपालिका परिवहनच्या के.एम.टी. उपक्रमास डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑईल कार्पोरेशन लि. या कंपनीकडून के.एम.टी. चालक कर्मचाऱ्यांना इंधन बचतीबाबत विशेष मार्गदर्शन शिबीराचे आयोजन के.एम.टी. मुख्य यंत्रशाळा येथे आयोजित करणेत आले होते.  या शिबीरामध्ये श्री.प्रभाकर सिन्हा, प्रबंधक, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. पुणे यांनी “सक्षम-2022” महोत्सवांतर्गत चालकांना विशेष मार्गदर्शन केले.  सुरक्षित चालन, इंधन बचत, वाहनांची वेगमर्यादा, वाहनांची दुरुस्ती देखभाल, इ.बाबत चालकांनी वाहन चालवताना घ्यावयाच्या दक्षतेसंबंधी मार्गदर्शन केले.  भविष्यात इंधन पुरवठयावर येणाऱ्या मर्यादा विचारात घेता, त्याचप्रमाणे वाढते इंधनाचे दर व उपलब्ध इंधनाचा काटकसरीने वापर करणे जरुरीचे आहे.   यासाठी सर्व चालकांनी जागरुक राहणे आवश्यक आहे.  यावेळी अति.परिवहन व्यवस्थापक श्री.मंगेश गुरव यांनी चालकांना इंधन बचतीबाबत माहिती दिली.  यावेळी महादेव बळवंत कुंभार, विलास वामन थरकडे, संजय विष्णु जाधव, उत्तम बळवंत पाटील या चालक कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करणेत आला.  सर्व उपस्थित चालकांना इंधन बचतीबाबत शपथ देणेत आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन कु.प्रियंका मेहरा – वरिष्ठ प्रबंधक इंडियन ऑईल, पुणे, चैतन्य ठक्कर – प्रबंधक इंडियन ऑईल कोल्हापूर, पृथ्वीराज माळी – सहाय्यक प्रबंधक, इंडियन ऑईल, कोल्हापूर के.एम.टी.चे वर्क्स मॅनेजर किरण चव्हाण, वाहतूक निरिक्षक रवि धुपकर, अंतर्गत लेखा परिक्षक बाबा पाटील, लेखापाल अरुण केसरकर, चालक निदेशक पी.बी.जाधव, अमेय जाधव व वाहतूक विभागाकडील चालक उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सहा.वाहतूक निरिक्षक श्री.सुनिल जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!