उत्तरेश्वर पेठेल नामदेव शिंपी समाजाच्या विद्यार्थी वसतिगृहास  रु.१० लाखांचा निधी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      उत्तरेश्वर पेठ येथील श्री नामदेव महाराज शिंपी समाज विद्यार्थी वसतिगृह येथे शेड बांधण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास विभागाकडून मंजूर रु.१० लाखांच्या निधीतील कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
      याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राजेश क्षीरसागर म्हणाले की, लोकराजा राजर्षि शाहू महाराज कोल्हापूरचे भाग्यविधाते आहेत. त्यांचा वारसा कोल्हापूरकराना लाभला हे आपल्या सर्वांचे भाग्य समजतो. राजर्षि शाहू महाराजांनाची कृपादृष्टी लाभलेला कोल्हापूर जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे. व्यापार, कला, क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रातील राजर्षि शाहू महाराजांचे काम अलौकिक आहे. कोल्हापूरवासियांसाठी राजर्षि शाहू महाराजांनी स्थापिलेल्या अनेक वास्तू प्रेरणादायी आणि आनंददायी आहेत. या वास्तूंचे संवर्धन हीच खरी आदरांजली असून, या वास्तूंचे जतन, संवर्धन आणि विकास ही आपली जबाबदारी आहे.
     याप्रसंगी निधी मंजूर केल्याबद्दल शिंपी समाजाच्यावतीने राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नंदकुमार मोरे, किरण शिराळे, ऋतुराज क्षीरसागर, शिंपी समाजाचे सरपंच अध्यक्ष प्रताप क्षीरसागर, उपसरपंच अलका बकरे, खजिनदार जगदीश बोंगाळे, सेक्रेटरी राहुल काकडे, किशोर नाझरे, महिला अध्यक्षा सुचिता महाडिक, हर्षराज कपडेकर, विनायक मुळे आदी समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!