विफाच्यावतीने ऑनलाईन फुत्सल रेफ्रीज् कोर्सचे आयोजन


कोल्हापूर • प्रतिनिधी
    वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा )च्यावतीने ऑनलाईन फुत्सल (Futsal) रेफ्रीज् कोर्स नविन रेफ्रीजसाठी ३ आणि ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.
     या कोर्ससाठी फुटबॉल खेळ व त्याची माहिती असणे आवश्यक आहे. कमीतकमी १० वी पास व १८ वर्षे पूर्ण पाहिजे. क्वालिफाईड फुटबॉल रेफ्री असल्यास तेही या कोर्समध्ये प्रवेश घेण्यास पात्र आहेत.
     तरी या कोर्ससाठी इच्छूक असणाऱ्यांनी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्हॉट्स ॲप नंबर ७५८८४६१९४० किंवा ksakolhapur@gmail.com या ई-मेलवर आपले पूर्ण नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, १०वी पास प्रमाणपत्र याची माहिती पाठवावी, असे केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *