शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा यांची जयंती मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली.
     कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
     यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी. आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, एमबीए अधिविभागाचे संचालक डॉ. एच. एम. ठकार, अधिसभा सदस्य डॉ. एस. डी. डेळेकर यांच्यासह एम.बी.ए., रसायनशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *