कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी गणेशमूर्तीची स्थापना केली.
प्रा.संदीप वाटेगावकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी अनिकेत जाधव, अरुण रयत, सतीश बाबर, संतोष पाटील, नामदेव कुंभार, शशिकांत यादव यांच्यासह विद्यापीठाचे अन्य कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली.
विद्यापीठामार्फत दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणरायाची यथासांग पूजाअर्चा करुन गणरायाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. गणेशोत्सवाचे पुढील पाच दिवस अत्यंत भक्तीमय वातावरणात पडतात. विद्यापीठात आपल्या श्रद्धेप्रमाणे पुढील पाच दिवस गणरायाची सेवा केली जाते. या दिवसांमध्ये रोज बाप्पाची पूजा केली जाते.
कोरोनाच्या नियमांचे पालन करून पुढील पाच दिवस हा गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.
या गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन अनिकेत जाधव व टीमने केले. या उपक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एन के पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी व सर्व स्टाफ यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.