जिओ – बीपी आणि टीव्हीएस मोटर यांची हातमिळवणी

Spread the love

• दुचाकी-तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणार
कोल्हापूर • प्रतिनिधी
        जिओ बीपी आणि टीव्हीएस मोटर कंपनीने देशात दुचाकी आणि तीनचाकी इलेक्ट्रीक वाहनांना चार्ज करण्यासाठी एक मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या शक्यता पडताळून पाहण्याचे मान्य केले आहे. हे जिओ बीपीच्या नेटवर्कवर आधारित असेल. या प्रस्तावित भागीदारी अंतर्गत, टीव्हीएस इलेक्ट्रिक वाहन ग्राहकांना जिओ- बीपीच्या विस्तृत चार्जिंग नेटवर्कमध्ये प्रवेश मिळेल. साहजिकच ही चार्जिंग स्टेशन्स इतर इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठीही खुली असतील.
      ग्राहकांना सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह चार्जिंग पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी AC चार्जिंग नेटवर्कसह DC फास्ट-चार्जिंग नेटवर्कदेखील तयार केले जाईल. या दोन्ही कंपन्यांकडे विद्युतीकरणाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्य आहे, ज्याचा उपयोग भारतीय बाजारपेठेतील कंपन्या ग्राहकांना नवीन अनुभव देण्यासाठी करतील.
      जिओ बीपी आपले इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग आणि स्वॅपिंग स्टेशन जिओ बीपी पल्स ब्रँड अंतर्गत चालवते. जिओ बीपी पल्स ॲपसह, ग्राहक सहजपणे जवळपासची चार्जिंग स्टेशन शोधू शकतात आणि त्यांची ईव्ही चार्ज करू शकतात. जिओ बीपी एक मजबूत चार्जिंग इकोसिस्टम देखील तयार करत आहे ज्याचा फायदा सर्व भागधारकांना होईल.
      टीव्हीएस मोटर कंपनीने नवीन इलेक्ट्रिक मोबिलिटी उत्पादने आणि संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. कंपनीने लाँच झाल्यापासून आपल्या पहिल्या हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस iQube च्या १२,००० पेक्षा जास्त युनिट्स विकल्या आहेत. टीव्हीएस iCube ही एक स्मार्ट, कनेक्टेड आणि प्रॅक्टिकल ईव्ही आहे जी ग्राहकांच्या रोजच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करते. कंपनी 5-25kW श्रेणीतील आणखी दोन तीन चाकी वाहनांचा संपूर्ण पोर्टफोलिओ तयार करत आहे, जी पुढील २४ महिन्यांत लॉन्च केली जाईल.
      ही भागीदारी देशातील दुचाकी आणि तीनचाकी वाहन ग्राहकांना ईव्ही आपलीशी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यास प्रोत्साहित करेल आणि भारताचे निव्वळ-शून्य उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्यात मदत करेल

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!