जिओकडून “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर; एका रिचार्जवर पूर्ण महिन्याची वैधता

Spread the love

• योजना देणारी जिओ पहिली टेलिकॉम ऑपरेटर कंपनी
कोल्हापूर • प्रतिनिधी
       भारतातील सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर, जिओने ‘कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी’ प्रीपेड योजना ही आणखी एक ग्राहक-केंद्रित नवीन योजना सादर करण्याची घोषणा केली आहे.
      ₹ २५९ ची योजना अद्वितीय आहे. कारण ती वापरकर्त्यांना १ कॅलेंडर महिन्याच्या कालावधीसाठी अमर्यादित डेटा आणि कॉलिंग यांसारख्या फायद्यांचा आनंद देते. ज्या तारखेला रिचार्ज केले जाईल त्याच तारखेला हा प्लॅन दर महिन्याला रिन्यू करावा लागेल.
      हा नवोपक्रम प्रीपेड वापरकर्त्यांना दर महिन्याला फक्त एक रिचार्ज तारीख लक्षात ठेवण्यास मदत करतो.
                                 योजनेबद्दल…..
• उदहरणार्थ वापरकर्त्याने ५ मार्च रोजी नवीन ₹२५९ मासिक प्लॅनसह रिचार्ज केल्यास, पुढील रिचार्ज तारखा ५ एप्रिल, ५ मे, जून इ.
• जिओच्या इतर प्रीपेड प्लॅनप्रमाणे, ₹ २५९ चा प्लान एकाचवेळी अनेक वेळा रिचार्ज केला जाऊ शकतो. ॲडव्हान्स रिचार्ज प्लॅन रांगेत जातो आणि सध्याच्या सक्रिय योजनेच्या एक्सपायरी तारखेला आपोआप सक्रिय होतो.
• योजना सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलद्वारे नवीन आणि विद्यमान वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
                              योजनेचे फायदे…..
• डेटा – १.५Gb/दिवस (त्यानंतर @ ६४Kbps)
• अमर्यादित व्हॉइस कॉल
• १०० SMS/दिवस
• जिओ ॲप्सची मोफत सदस्यता
• वैधता – १ महिना (दर महिन्याला त्याच तारखेला नूतनीकरण) 
——————————————————-

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!