घोडावत कन्झ्युमरचे २००० कोटींचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट: संजय घोडावत

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत उद्योग समूहातील घोडावत कन्झ्युमर (जीसीपीएल) कंपनीने नुकताच आपल्या उच्च दर्जाच्या उत्पादनावर २०२०-२१ या आर्थिक वर्षात १००० कोटी महसुलीचा टप्पा पार केला आहे. २०२३ अखेर २००० कोटींचा टप्पा गाठण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे उद्योगपती संजय  घोडावत यांनी स्पष्ट केले.
     उच्च दर्जाची उत्पादने किफायतशीर किंमतीत देण्यासाठी २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या घोडावत कन्झ्युमरने ग्रुपचे चेअरमन संजय  घोडावत आणि घोडावत कन्झ्युमरचे एमडी श्रेणिक घोडावत यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली अल्पावधीतच मोठे यश संपादन केले आहे.
     कंपनीने २०१४ मध्ये केवळ खाद्यतेलापासून सुरू झालेला हा व्यवसाय आजमितीला आटा, तांदूळ, साखर, मीठ, गुळ, डाळी, स्नॅक्स, नमकीन, बेव्हरेजेस, डेअरी, वैयक्तिक आणि होमकेअर उत्पादन श्रेणींमध्ये विस्तारला आहे. कंपनीने आपल्या ‘स्टार’ या लोकप्रिय ब्रँडच्या अंतर्गत फूड प्रॉडक्ट आणि नॉन-फूड प्रॉडक्ट श्रेणीमध्ये अनुक्रमे ‘आयुरस्टार’ आणि ‘क्लेमॅक्स’ सारखी अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणली आहेत. आज कंपनीची उत्पादने हजारो किराणा स्टोअर्समध्ये (जनरल ट्रेड), डीमार्ट, रिलायन्स रिटेल, मेट्रो कॅश अँड कॅरी सारख्या अनेक आधुनिक व्यापार चॅनेलमध्ये आणि अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या लोकप्रिय ई-कॉमर्स चॅनेलवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घोडावत कन्झ्युमरने बनवलेल्या उत्पादनांवर आज जगभरातील लाखो लोक विश्वास ठेवतात आणि ती वापरतात.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!