कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत पॉलीटेक्निकचे गणित विषयाचे प्रा.गफूरसो अशरफ मकानदार यांना युवा बौद्ध धम्म परिषद यांच्यावतीने ”राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. याबद्दल संस्थेचे प्राचार्य विराट गिरी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अकॅडमिक डीन प्रा.शुभांगी महाडिक व प्रा.सचिन कांबळे उपस्थित होते.
प्रा.गफूरसो मकानदार यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या आधीही त्यांना श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था, इचलकरंजी या संस्थेतर्फे २०२१ या वर्षाचा ”आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला होता.
प्रा.मकानदार हे मूळचे गडहिंग्लजचे असून सुरुवातीपासूनच त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड आहे. मग ते गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करणे, गरजूला,समाजातील उपेक्षित घटकांना मदत, इत्यादी विविध कामे त्यांच्या सामाजिक कार्याचा संदेश देतात. त्यांनी महापूर व कोरोना च्या संकटामध्ये सामाजिक भान जपून गरजूना मदत केली आहे.
प्रा. मकानदार यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण साधना हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज येथे झाले. पुढे त्यांनी राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथून गणित विषयातून पदवी संपादन केली. यानंतर पदव्युत्तर शिक्षण त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. याचबरोबर त्यांनी आयएसटीईने घेतलेल्या रामानुजन या प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या परीक्षेत देशात ६ वा क्रमांक पटकाविला आहे.
या यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी ही त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.