घोडावत आयआयटी व मेडिकल अॕकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश


कोल्हापूर • प्रतिनिधी
     किशोर वैज्ञानिक व जेईई मेन्स बीटेक आर्किटेक्चर परीक्षेत घोडावत आयआयटी व मेडिकल अॕकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
     संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अॕकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांनी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये प्रणव पाटील देशात १७७ वा, वरद जाधव देशात ४४७ वा आणि विपुल पाटील याने देशात ८२८ वा  क्रमांक पटकाविला आहे.
    तसेच जेईई मेन्स बीटेक आर्किटेक्चर परीक्षेत अॅकॅडमीच्या ४ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेन्टाइलच्यावरती गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये तुषार शेट्टी ९९.९१, ऋद्धी शाह ९९.८०, प्रणील महाजन ९९.६१, तेजल लडगे ९९.३० पर्सेन्टाइल गुण मिळविले आहेत.
     किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत पुरस्कृत आहे. अभ्यासासाठी प्रतिभा आणि योग्यता असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे व तसेच विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी ही परीक्षा राबविली जाते.
 अॕकॅडमीचे संचालक श्री. वासू सर म्हणाले ” जिद्द, मेहनत, चिकाटी असेल  तर यश नक्कीच प्राप्त होते. या वर्षीचा हा निकाल त्याचेच फलित आहे. यापुढेही यशस्वी व उच्चांकी निकालाची परंपरा चालू राहण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
      या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी अॅकॅडमीचे संचालक श्री. वासू सर व टीम यांचे व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *