घोडावत ऑलिम्पियाड स्कुल डॉ.विक्रम साराभाई गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित

Spread the love

• विद्यार्थ्यांचे डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत यश
कोल्हापूर • प्रतिनिधी
       संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कुलच्या विद्यार्थ्यांनी २०२१-२२ साली झालेल्या डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक अंतिम परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. यामध्ये श्रेयस धोत्रे, उत्कर्षा हलिंगने, पारस वांजळे यांनी सुवर्ण तर मधुरा वांजळे, अन्विता जोशी, पियुष कोरे, संवेद कुलकर्णी यांनी रौप्य तर आस्था पवार, सिद्धार्थ पाटील, रणवीर पवार यांनी कास्य पदक पटकावले. यामध्ये स्कुलने ३ सुवर्णपदक, ४ रौप्यपदक व ३ कांस्यपदक असे मिळून १० पदके पटकाविली.
      कोल्हापूर विभागात डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक या परीक्षेत सर्व मिळून १२ पदके प्राप्त झाली आहेत, यापैकी १० पदके संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कुलने मिळविली. जवळपास १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कुलचा हा निकाल या विभागातील सर्वोत्तम निकाल आहे.
या उच्चांकी निकालाबद्दल मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांच्याकडून संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कुलला ”डॉ.विक्रम साराभाई गुणवत्ता”या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्कुलच्यावतीने झोनल हेड श्री. प्रभू यांनी हा पुरस्कार स्विकारला.
       या यशाबद्दल बोलताना संचालक श्री. वासू म्हणाले की, ऑलिम्पियाड स्कुलने आपल्या उच्चांकी निकालाच्या माध्यमातून पालक व विद्यार्थी यांची विश्वासाहर्ता प्राप्त केली आहे आणि या यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही तत्पर राहू असे बोलून त्यांनी सर्व विद्यार्थी पालक व स्टाफचे अभिनंदन केले.
      संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कुल हे सौ.नीता संजय घोडावत फौंडेशन संचलित स्कुल आहे. या स्कुलने याआधीही डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
      या यशाबद्दल घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी संचालक श्री.वासू, झोनल हेड श्री. प्रभू व सर्व स्टाफ, विद्यार्थी, पालक यांचे अभिनंदन केले. ——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!