घोडावत पॉलीटेक्निकला आयएसटीईकडून ”बेस्ट पॉलीटेक्निक” हा पुरस्कार प्रदान


कोल्हापूर • प्रतिनिधी
     इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई), दिल्ली यांच्याकडून संजय घोडावत पॉलीटेक्निकला ”बेस्ट पॉलीटेक्निक” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आय. के. गुजराल पंजाब टेक्निकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बुटासिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आयएसटीईचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह देसाई, आयएसटीईचे मेम्बर सेक्रेटरी राजीव कुमार आदी उपस्थित होते.
     संजय घोडावत पॉलीटेक्निकला या आधीही विविध मानांकन व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनासाठी सर्वोच्च व प्रतिष्ठित असलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडेशन अर्थातच एनबीए, नवी दिल्ली समितीकडून सलग दोनवेळा संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या सर्व शाखांना एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. अवघ्या ६ वर्षाच्या कालावधीत एनबीएकडून सर्व शाखांना मानांकन प्राप्त झालेली संजय घोडावत पॉलीटेक्निक ही महाराष्ट्रातील पहिलीच संस्था आहे.
     संजय घोडावत पॉलीटेक्निकला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून ‘इलेक्ट्रिकल मशीन” लॅब ला महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाची लॅब म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. याचबरोबर या वर्षी संजय घोडावत पॉलीटेक्निकला टुडे रिसर्च अँड रेटिंग्स, नवी दिल्ली  या संस्थेमार्फत ”बेस्ट अपकमिंग पॉलीटेक्निक इन महाराष्ट्र” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून सर्व शाखांना ”उत्कृष्ट दर्जा” ही मिळाला आहे. तसेच क्नॉलेज रिव्ह्यू मासिकाकडून  “भारतातील टॉप टेन पॉलीटेक्निकमधील एक पॉलीटेक्निक” म्हणून गौरविण्यात आले आहे.
     याबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी प्राचार्य विराट गिरी व सर्व स्टाफचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *