घोडावत विद्यापीठ फार्मसी विभागातर्फे ”औषधनिर्मितीमधील संशोधनाची मुलतत्वे ” या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा


कोल्हापूर • प्रतिनिधी
       संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फार्मसी अधिविभागामार्फत ”औषधनिर्मितीमधील संशोधनाची मुलतत्वे ” या विषयावर दोन दिवसीय ऑनलाईन पद्धतीने नुकतीच राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी व त्यांनी नाविन्याचा ध्यास घ्यावा हे या कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट होते. या कार्यशाळेस देशभरातील ५०० हुन अधिक शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
     या कार्यशाळेबद्दल बोलताना स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. शिरीषकुमार आंबवडे म्हणाले, कोवीड विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले असताना संशोधकाकडे सर्वात आव्हानात्मक बाब होती ती म्हणजे त्यावर लस निर्माण करणे व त्यांना वर्षभरातच लस निर्माण करण्यात यश आले. कोणत्याही आजारावर लस किंवा औषध निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या संशोधनाची ओढ ही पदवीशिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांमध्ये तयार होणे आज काळाची गरज बनली आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
      या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्युअर फौंडेशनचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीकांत पवार, झेन व्हिजन फार्माचे मॅनेजर डॉ.राजेंद्र वाघमोडे, सेंच्युरिअन विद्यापीठाचे प्रा. डॉ.सुजितकुमार मिश्रा, घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शिरीषकुमार आंबवडे, प्रा.डॉ. विश्वजित घोरपडे आणि प्रा.डॉ.अभिनंदन पाटील हे होते.
     कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यासाठी स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता प्रा.डॉ.शिरीषकुमार आंबवडे, डॉ. विश्वजीत घोरपडे, डॉ. अभिनंदन पाटील, प्रा.सोनाली निरंकारी, प्रा.भाग्यश्री घाटे, तुकाराम जंगम व टीमने अथक परिश्रम घेतले.
      या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्रभारी कुलगुरू डॉ.एम.टी.तेलसंग, कुलसचिव डॉ. एन.के पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *