‘घोडावत’च्या प्रदीप गिलची पश्चिम महाराष्ट्रमधून ”सेबी ग्रेड-ए”पदी निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस (SGIAS) च्या बँकिंग अकॅडमीचा विद्यार्थी प्रदीप गिल याची सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी/SEBI) “ग्रेड ए” पदी निवड झाली. ही निवड संपूर्ण भारतातून निवडलेल्या ८० विद्यार्थ्यांमधून पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव निवड आहे. इन्स्टिटयूटच्या विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम राखत एमपीएससी, बँकिंग, परीक्षेबरोबरच सेबी परीक्षेत ही उत्तुंग यश संपादन केले आहे.
       इन्स्टिटयूटने सन २०२२ मध्ये एमपीएससी परीक्षेतमधून ४ विद्यार्थी, बँकिंग परीक्षेमधून २० पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच विविध स्पर्धा परीक्षाच्या क्षेत्रातून आपली निकालाची परंपरा कायम राखली आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेसने आजवर अवघ्या तीन ते चार वर्षांमध्ये १७५ हून अधिक विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध अधिकारी पदांवर तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या उच्च पदावर नोकरी मिळविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. अलीकडेच या इन्स्टिट्यूटबाबत विद्यार्थ्यांना अधिकारी बनवण्याबाबत सखोल व योग्य मार्गदर्शन, मार्गदर्शक करत असल्यामुळे हा यशाचा चढता आलेख वाढत असताना दिसतो आहे. विद्यार्थ्यांची अधिकार पदावर निवड हेच अंतिम ध्येय घेऊन या क्लासची निर्मिती झाली आहे तो हेतू व प्रयत्न आता पूर्ण होत असताना दिसत आहे.
      यशस्वी विद्यार्थ्यांना संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक विराट गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.
       तसेच सदर विद्यार्थ्यांना सेंटर हेड अक्षय पाटील, ब्रॅच मॅनेजर अमोल पाटील, बँकिंग हेड प्रा.जी. एस. पवार, प्रा. सचिन शिलवंत, प्रा. संग्राम पाटील, ब्रॅच मॅनेजर सूर्यकांत कांबळे व प्रा.भरत साबळे यांचे मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!