कोल्हापूर • प्रतिनिधी
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यांने २०१९-२० या हंगामांमध्ये गळीतास आलेल्या ऊसपिकास एफ.आर.पी. पोटी २८०० रुपये प्रतिटन अदा केले होते. ऊस उपलब्धतेसाठी व तालुक्यातील इतर कारखान्यांच्या दराबाबत स्पर्धेसाठी २९००/- रु. प्रतिटन कारखाना ऊसउत्पादक शेतकऱ्यांना देईल, असे अभिवचन कारखाना व्यवस्थापनाने दिले होते. त्यापोटी ५०/- रुपये प्रतिटन गणेशोत्सवमध्ये व दसरा-दीपावली सणाच्या दरम्यान ५०/- रुपये प्रतिटन देण्याचे अभिवचन दिले होते. दरम्यान, गणेशोत्सव काळामध्ये ५०/- रुपये अदा केले असून दसरा- दीपावली सणाच्या निमित्ताने बुधवार दि.१४ ऑक्टोबर रोजी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले असून शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन पैसे घेऊन जाण्याची विनंती आहे. कारखान्याचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
दरम्यान, साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ रविवार दि.१८ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता व गळीत हंगाम शुभारंभ शुक्रवार दि.३० ऑक्टोबर रोजी होत आहे.