गोकुळ”चा ५८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

• गुणवंत कामगार, गोकुळश्री स्‍पर्धा विजेते व क्रियाशील वितरकांचा सत्‍कार
कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     गोकुळचे वैभव हे उत्‍पादक, कर्मचारी, वितरक व ग्राहक या चार स्‍तंभावर उभे असून सर्वांच्‍या प्रामाणिक कार्यावर वैभवामध्‍ये आणखीन भर पडत आहे, असे गौरवोद्गार संघाचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी गोकुळच्‍या ५८ व्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात काढले.
      यावेळी वर्षभरामध्‍ये संघाच्‍या विविध विभागामध्‍ये उत्कृष्ट काम केलेल्‍या कामगारांचा गुणवंत कामगार म्‍हणून सपत्‍नीक सत्‍कार, गोकुळश्री स्‍पर्धेतील विजेते, ३ म्‍हैस स्‍पर्धक व ३ गाय स्‍पर्धक यांचा सपत्‍नीक सत्‍कार तसेच मुंबई, पुणे, कोल्‍हापूर व कोकण येथील जास्‍तीत-जास्‍त दूध वितरण करणाऱ्या वितरकांचा सत्‍कार संघाचे चेअरमन रविंद्र आपटे व सर्व संचालकांच्‍या हस्‍ते करण्यात आला.
      कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करून झाली. सूत्रसंचालन एम. पी. पाटील यांनी केले तर आभार माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक रणजितसिंह पाटील यांनी मानले.
      यावेळी माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके, रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील, अरूण डोंगळे, संचालक विश्‍वास जाधव,  धैर्यशील देसाई, दिपक पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, आमदार राजेश पाटील, बाळासो खाडे, अमरिशसिंह घाटगे, सत्‍यजीत पाटील, विलास कांबळे, संचालिका अनुराधा पाटील, विजय उर्फ बाबा देसाई, रामराज देसाई कुपेकर, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, शशिकांत पाटील-चुयेकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *