उपमुख्यमंत्री अजित पवारांशी गोकुळच्या संचालकांनी साधला संवाद


कोल्हापूर • ( जिमाका )
     कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरूवारी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन संवाद साधला.
     यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार सर्वश्री जयंत आसगावकर, प्रकाश आबिटकर,  राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळ चेअरमन विश्वास नारायण पाटील, संचालक  डॉ. सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील – चुयेकर, कर्णसिह गायकवाड, रणजित पाटील, अजित नरके, अभिजित तायशेटे, संभाजी पाटील, किसन चौगुले, नंदकुमार ढेंगे आदी उपस्थित होते.
     यावेळी गोकुळ दूध संघाची तसेच सहकार क्षेत्राची पुढील वाटचाल आणि समस्यांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *