गोकुळ कर्मचारी पतसंस्‍थेतर्फे चेअरमन विश्वास पाटील यांचा सत्‍कार


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्‍था मर्या., कोल्‍हापूर या संस्‍थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यावतीने गोकुळ दूध संघाचे नूतन चेअरमन विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांचा व माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे यांचा गोकुळ कर्मचारी पतसंस्‍थेच्‍यावतीने  सत्‍कार करण्‍यात आला.
     यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्‍हणाले की, कर्मचारी पतसंस्‍था ही अगदी कमी व्‍याजदराने कर्मचारी सभासदांना कर्ज उपलब्‍ध करुन देणारी संस्‍था असून, अतिशय चांगल्‍या प्रकारे संस्‍था चालविलेली आहे व संस्‍थेची १००% कर्ज वसूली आहे. त्‍यामुळे त्‍यांनी संचालक मंडळ व व्‍यवस्‍थापनाचे कौतुक करुन आभार मानले.
     यावेळी बोलताना अरुण डोंगळे यांनी कर्मचारी पतसंस्थेस गोकुळ दूध संघास सर्वोत्‍परी मदत करेल असे आश्‍वासन दिले. तसेच संस्थेच्या संचालक मंडळाने सभासदाचे हित जोपासून कामकाज करावे असे मत व्यक्त केले.
     याप्रसंगी गोकुळ कर्मचारी पतसंस्‍थेचे चेअरमन प्रकाश आसुर्लेकर, व्हा. चेअरमन सतिश मदने, पी. आर. पाटील, संभाजी देसाई, शिवाजी पाटील, नंदकुमार गुरव, सुनिल घाटगे, राजेंद्र पाटील, गणपती कागनकर, संचालिका शुभदा पाटील, छाया बेलेकर, व्‍यवस्‍थापक संभाजी माळकर संस्थेचे कर्मचारी आदि उपस्थित होते.
——————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *