गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांचा सत्कार

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी १२ डिसेंबर २०२१ रोजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता व फिनिशर मेडल मिळाले. याबद्दल त्‍यांचा सत्कार संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित करण्‍यात आला.
      यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले कि, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले हे मॅरेथॉन, सायकलिंग, पोहणे, ट्रायथलॉन अशा अनेक स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. त्यांचे काम कौतुकास्पद आहे. एखाद्या संस्थेमध्ये कार्य करीत असणारा कर्मचारी वर्ग हा शारिरीक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण त्याच्यावरील असणारा कामाचा व ताणतणावाचा प्रभाव त्याच्या व्यक्तीमत्त्वावर व कामकाजावर पडत असतो. योग्य व्यायाम, योगा, सात्विक आहार हे फार महत्वाचे आहे. व्यायामामुळे शरीर व मन दोन्ही निरोगी राहतात. व्यायाम आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून सर्वांनी दिवसातून थोडातरी वेळ काढून व्यायाम करायला हवा. तसेच संघांतर्गत भविष्यात कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्याचा मानस आहे.
     यावेळी सत्कारास उत्तर देताना कार्यकारी संचालक योगेश गोडबोले म्‍हणाले कि, या मॅरेथॅानचे अंतर २१ किलोमीटर पूर्ण केले आहे व सातारा हिल मॅरेथॉनमध्‍ये सलग पाचवेळा भाग घेतला आहे. हाफ मॅरेथॉनमध्‍ये आजपर्यंत ३१ वेळा भाग घेऊन यशस्‍वीरीत्‍या पूर्ण केले आहे. १०० किमी सायकलिंग चारवेळा यशस्‍वीरित्‍या पूर्ण केले आहे. फुल मॅरेथॉन नाशिक व मुंबई पूर्ण केले आहे. ट्रायथलॉन १.५ किमी ओपन वॉटर पोहणे, किमी धावणे यांचा समावेश असलेले २०१८ मध्ये कोल्हापूर येथे यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मी सात वर्षांपूर्वी माझा क्रीडा क्रियाकलाप सुरू केला आणि माझा विश्वास आहे की कोणताही खेळ सुरू करण्यासाठी वय हा अडथळा नाही. फक्त इच्छाशक्ती, समर्पण, दृढनिश्चय आणि केंद्रित दृष्टीकोन आवश्यक आहे. मला सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिल्याबद्दल गोकुळचे चेअरमन व सर्व संचालक मंडळाचे विशेष आभार मानले.
      याप्रसंगी याप्रसंगी संघाचे जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
——————————————————- Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!