सभापती श्रीमती मंगल पाटील यांचा गोकुळतर्फे सत्कार


कोल्हापूर • प्रतिनिधी
      गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये करवीर पंचायत समिती सभापतीपदी  निवड झाल्‍याबद्दल श्रीमती मंगलताई आनंदराव पाटील (नेर्ली) यांचा  सत्‍कार संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. श्रीमती मंगल आनंदराव पाटील या संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्‍या भावजय व संघाचे सेवानिवृत्‍त अधिकारी कै. आनंदराव पाटील यांच्या पत्‍नी आहेत.
     सत्‍कारावेळी बोलताना श्रीमती मंगल पाटील म्‍हणाल्‍या की, गोकुळ दूध संघ हा सहकारातील शिरोमणी असून, सहकाराचे एक उत्‍तम उदाहरण आहे. गोकुळ परिवाराचे व पाटील कुटुंबियांची ऋणानुबंध हे जुने आहेत. तसेच करवीर पंचायत समितीतील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन लोकाभिमुख आणि पारदर्शक कामकाज करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत.
     यावेळी चेअरमन विश्वास पाटील, जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित  तायशेटे, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश  पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस. एम. पाटील आदि उपस्थित होते.