कोल्हापूर • प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गोकुळतर्फे सत्कार करण्यात आला.
आनंद अशोक पाटील (रा. दारवाड, ता.भुदरगड) हे युपीएससी परीक्षेत देशामध्ये ३२५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमुळे दुर्दैवाने दृष्टी अल्प झाली. यावर मात करीत त्यांनी मनाशी ध्येय बाळगून आय.ए.एस होण्याचे स्वप्न पहिले व ते स्वप्न पूर्ण केले. संकेत संतोष तायशेटे (रा. राधानगरी) यांची सिंगापूर येथे होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कु. विद्या तानाजी मगदूम (रा. चुये, ता.करवीर), हिची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच संघ सेवानिवृत्त झालेले तावरेवाडी सेंटरचे वॉचमन शिवाजी विठोबा जगदाळे या सर्वांचा सत्कार संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचे हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित सत्कार करण्यात आला व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संघाचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक अरूण डोंगळे, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.