कोल्हापूर • प्रतिनिधी
जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट, अनेक उद्योगधंदे आर्थिक मंदीत सापडले असतानासुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्यवस्था सुयोग्य पद्धतीने चालू ठेवून आपण वेगळा ठसा उमटवला व जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना आधार दिला, असे गौरवोउद्गार आरोग्य राज्यमंत्री राजेन्द्र पाटील – यड्रावकर यांनी काढले.
गोकुळच्या गावपातळीवरील बल्क मिल्क कुलर युनिटचे उद्घाटन श्री. आनंद एम सहकारी दूध संस्था मर्या., कवठेसार (ता. शिरोळ) येथे राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेत वाढ करावयाची झाल्यास बल्क कुलर हि योजना जिल्ह्यातील सर्व दूधसंस्थानी प्रथम प्राधान्याने राबवावी, ज्यामुळे दूध उत्पादकांना अधिक लाभ होण्याबरोबरच ग्राहकांना देखील उत्तम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळू शकतील. तसेच दूध उत्पादकांनी पारंपारिक दुग्ध व्यवसाय न करता आपल्या गावातील सर्व दूध संस्थानी मान, प्रतिष्ठा बाजूला ठेऊन एकत्र येऊन गावात बल्क कुलर बसवून आधुनिक दुग्ध व्यवसायाचा मार्ग स्वीकारावा ज्यामुळे सर्वांचीच प्रगती होईल. गोकुळने दूध उत्पादक तसेच दूध संस्थांना दिलेल्या सेवासुविधांचा – योजनाबद्दल संस्था प्रतिनिधींनी संघाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन त्या योजना संस्था पातळीवर राबवणे गरजेचे आहे. याचबरोबर जास्तीत जास्त दूध दर देण्यासठी आम्ही सर्व संचालक मंडळाने नियोजन केले आहे.त्याची अमलबंजावणी सुरू असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
यावेळी संघाचे संचालक अजित नरके व सुजित मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी केले.
यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, किसन चौगले, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, संघाचे अधिकारी, दूध संस्थाचे चेअरमन व सचिव उपस्थित होते.