कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील लाखो लोकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या दैनंदिन संकलन व विक्री व्यवस्थेवर गेले पाच ते सहा दिवस परिणाम झाला आहे. यामध्ये सरासरी दूध संकलन हे पाच ते साडेपाच लाख लिटर्स कमी झाले होते. तसेच मुंबई, पुणे व इतर ठिकाणी होणारी दूध विक्रीही होऊ शकली नाही.
दि.२२ ते २६ जुलै या कालवधीमध्ये म्हैस दूध ७ लाख ५३ हजार लिटर्स व गाय दूध ८ लाख ८९ हजार लिटर्स असे एकूण १६ लाख ४३ हजार लिटर्स इतके सरासरी संकलन होऊ शकले नाही. त्याची अंदाजे रक्कम ६ कोटी १६ लाख रूपये इतके संघाच्या दूध उत्पादकाचे नुकसान झाले आहे.
तसेच या कालावधीमध्ये मुंबई, पुणे कोकण विभाग इत्यादी ठिकाणी अंदाजे २० लाख ८८ हजार लिटर्स दूध विक्री कमी प्रमाणात झाल्यामुळे १० कोटी ४४ लाख रूपये इतके नुकसान झाले आहे. गोकुळ संलग्न दूध उत्पादक व गोकुळ एकूण १६ कोटी ६० लाख रूपये नुकसान झाले आहे. शासनाने अनुदान स्वरुपात दूध उत्पादकास व संघास मदत द्यावी. तसेच जिल्ह्यातील जनावरांच्या औषध उपचारांकरीता संघाच्या दहा डॉक्टरांचे पथक तयार केले असून ती सेवा चोवीस तास चालू असून महापूरात व महापूरानंतर जनावरांना रोगराई होवू नये यासाठीही पूरग्रस्त भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत इतर सर्व खबरदारी युध्दपातळीवर घेणेत येत आहे. दूध संघाशी संलग्न सर्व दूध उत्पादकांनी संघाची किसान विमा पॉलिसी करावी, यामुळे येणाऱ्या आर्थिक संकटाला तोंड देता येईल असे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी चेअरमन विश्वास पाटील, संचालक प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर, संघाचे अधिकारी आदी उपस्थित होत