कोल्हापूर भूमीतील गोकुळ दूध आता सिंधुभूमीत होणार पॅकिंग…

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
    कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) चे सिंधुभूमी डेअरी फार्म नाधवडे, तालुका वैभववाडी येथे दूध पॅकिंग चालू करण्यात आले त्याचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि.८) पार पडला.
     कोकणातील नेमळे, फोंडा या भागातून संकलित होणारे दूध संघामार्फत बसविलेल्‍या बल्‍क मिल्‍क कुलरमध्‍ये साठविण्‍यात येते व टँकरद्वारे गोकुळ येथे आणले जाते. त्यावर प्रक्रिया करून ते दूध पुन्हा रत्नागिरी,चिपळूण,कुडाळ,गोवा या ठिकाणी विक्रीसाठी पाठविले जाते. संघाचा वाहतूक खर्च कमी व्हावा व कोकणवासियांना दूध लवकरात लवकर उपलब्ध व्हावे हा हेतू समोर ठेवून कोकण भागात संकलित होणाऱ्या दूधावर प्रक्रिया करुन कोकणातच पॅकींग करुन ग्राहकांना उपलब्‍ध करुन देण्‍याचा गोकुळने महत्‍वपूर्ण निर्णय घेतला. सध्‍या नेमळे, फोंडा या भागातून दररोज अंदाजे २२ हजार लिटर दूध संकलित होत असून, ते सिंधुभूमी डेअरी फार्म यांच्‍याकडे पॅकींग केले जाणार आहे. भविष्‍यात या भागातील दूध उत्‍पादकांचे हित डोळयासमोर ठेवून दूध संकलनामध्‍ये वाढ करण्‍यासाठी संघाच्‍या सर्व सेवा-सुविधा,योजना दूध उत्‍पादकांना देण्‍यात येणार असून दूध संकलन व विक्री अंदाजे १ लाख लिटर करण्‍याचा संघाचा मानस आहे.
     यावेळी दूध पॅकींग मशीनवर पिशव्‍या पॅकींगचा शुभारंभ संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक रणजितसिंह पाटील व  विश्वास पाटील (आबाजी), तसेच प्रयोगशाळेचे उद्घाटन जेष्ठ संचालक विश्वास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
     याप्रसंगी सिंधुभूमी डेअरी फार्मचे संस्थापक आमदार प्रमोद जठार, गोकुळचे संचालक सर्वश्री बाळासो खाडे, उदय पाटील,विजय तथा बाबा देसाई, विलास कांबळे, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर ,  कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, डेअरी मॅनेजर ए.वाय.चौधरी, गुणनियंञण मॅनेजर सुरज समुद्रे,मार्केटिंग मॅनेजर हणमंत पाटील,शशिकांत पाटील, रामचंद्र भोगम, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!