कोल्हापूर • प्रतिनिधी
गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयावर भेट घेतली. यावेळी डॉ.डी वाय.पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापूरे उपस्थित होते.
गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर गोकुळचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची निवड झाली. यानंतर पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन आभार मानले. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नूतन अध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
ना.सतेज पाटील यांनी सांगितले की, दूध उत्पादक सभासदांनी आपल्यावर विश्वास ठेवून गोकुळमध्ये सत्तांतर घडवले आहे. त्यामुळे उत्पादकांना न्याय देण्यासाठी अध्यक्ष म्हणून आपण आपला सर्व अनुभव पणाला लावावा. निवडणुकीमध्ये उत्पादकांना आपण दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी सर्व संचालकांना सोबत घेऊन काम करावे. दूध उत्पादक केंद्रस्थानी ठेवूनच अत्यंत काटकसरीने कारभार करावा, अशी अपेक्षाही पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली.