गोकुळचे “सिलेक्‍ट” टेट्रापॅक दूध

Attachments


कोल्‍हापूर  • प्रतिनिधी
     घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने दूधामध्ये आणखीन एका नव्या रूपामध्ये म्हणजे यु.एच.टी.ट्रीटेड होमोजीनाईज्‍ड टोण्‍ड दूध नविन आकर्षक अशा टेट्रापॅकमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. त्याचा विक्री शुभारंभ आज घटस्थापनेच्या शुभदिनी गोकुळ प्रकल्प येथे चेअरमन रविंद्र आपटे व जेष्‍ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते  व इतर मान्यवर संचालक तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
  सध्‍या बाजारात गोकुळ फूल क्रीम व गाय दूधाची विक्री कोल्हापूर, पुणे, मुंबई,सिंधुदूर्ग,रत्‍नागिरी,सांगली, बेळगाव,गोवा या ठिकाणी दररोज अंदाजे १२ लाख लिटर्सपर्यंत  केली जात आहे. गोकुळच्‍या गुणवत्‍तेवर ग्राहकांचा प्रचंड विश्‍वास असल्‍याने गोकुळ दूधाबरोबर गोकुळ दुग्‍धजन्‍य पदार्थांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
            मुंबई व उपनगरे,ठाणे,रायगड,पालघर,पुणे येथील ग्राहक ज्‍यांना त्‍यांच्‍या दैनंदीन कामकाजाच्‍या स्‍वरुपामुळे दररोज दूध आणणे शक्‍य होत नाही अशाप्रकारचे ग्राहक व मॉलमधून दैनंदिन वस्‍तु खरेदी करणारा ग्राहक यांच्‍या मागणीचा विचार करुन गोकुळने यु.एच.टी. ट्रीटेड होमोजीनाईज्‍ड टोण्‍ड दूध “सिलेक्‍ट” या नावाने टेट्रापॅकमध्‍ये उपलब्‍ध करुन दिले आहे. महासंघाच्‍या महानंद दुग्‍धशाळा,गोरेगांव,मुंबई येथे टोण्‍ड दूधावर प्रक्रीया करुन टेट्रा पॅकमध्‍ये पॅकींग करण्‍यासाठी त्‍यांच्‍याशी करार केला आहे. दि १७ ऑक्‍टोबर पासून सुरुवातीस मुंबई उपनगरे, ठाणे,रायगड व कोल्‍हापूर येथे टेट्रपॅकमध्‍ये  “सिलेक्‍ट” या नावाने दूध विक्रीसाठी उपलब्‍ध करुन दिले जाणार असून, लवकरच पुणे व इतर जिल्‍ह्यामध्‍ये मागणीप्रमाणे “सिलेक्‍ट” टेट्रापॅक विक्रीसाठी उपलब्‍ध केले जाईल. “सिलेक्‍ट” टेट्रापॅकमध्‍ये पॅकींग केलेले दूध हे मनुष्‍य हस्‍तस्‍पर्श विरहीत स्‍वयंचलित अत्‍याधुनिक प्‍लँन्‍टमध्‍ये प्रक्रीया व पॅकींग होते. सदर दूध साधारणतः १३५ ते १३७ डिग्री सेंटीग्रेडला  हिटींग केले जात असलेने दूधातील सर्व बॅक्‍टेरीया नष्‍ट होऊन १८० दिवस रुम टेंम्‍प्रेचरला टिकण्‍याची क्षमता त्‍यामध्‍ये आहे. सदर दूधाचे पॅकींग उघडल्‍यानंतर रेफ्रिटरेटेड तापनाला किमान दोन दिवस दूधाचा वापर करता येतो.सदर दूध हे सहा स्‍तरीय असेप्‍टीक कार्टनमध्‍ये पॅकींग केले असून पॅकींग मटेरीयल अंतराष्‍ट्रीय नामवंत कंपनी मे.टेट्रापॅक इंडिया लि., यांचेकडून उपलब्‍ध केले आहे. सध्‍या दररोज २५ हजार लि. इतक्‍या दूधाच्‍या टेट्रापॅकिंगने सुरुवात करण्‍यात येणार आहे.
   “सिलेक्‍ट” टेट्रापॅक टोण्‍ड दूध सुरुवातीस ग्राहकांच्‍या मागणीस्‍तव १ लि. पॅकिंगमध्‍ये रु. ६४/- इतक्‍या माफक किंमतीस ग्राहकांना उपलब्‍ध होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *