गोकुळने कोल्‍हापूरप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गोकुळ पॅटर्न राबवावा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)ला आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघाचे एम. के. गावडे आणि पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्‍यांचे स्‍वागत गोकुळ संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील व  संचालक मंडळाने केले.
     राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या गोकुळ दूध संघाने कोल्‍हापूर जिल्‍हातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. त्यातून पारंपारिक दुग्ध व्यवसायाला व्यवसायिक स्वरूप देऊन  गोकुळ दूध संघाने दुग्ध व्यवसायाला संघटीत स्वरूप देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले आहे.याच प्रमाणे गोकुळ दूध संघाने सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील शेतक-यांसाठी संकलन, पशुवैद्यकीय सेवा द्यावी तसेच आमच्‍या जिल्‍ह्यातील दूध उत्‍पादक शेतकऱ्यांकरीता आपल्‍या प्रशिक्षण केंद्रामार्फत आमच्‍या दूध उत्‍पादक शेतकऱ्यांकरीता प्रशिक्षणाचे नियोजन करावे व जातीवंत म्‍हैस खरेदी करण्यासाठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील दूध उत्‍पादकांसाठी जी योजना आहे त्‍या पध्‍दतीनेच आमच्‍याही जिल्‍हासाठी राबविण्यात यावी. गोकुळने कोल्‍हापूरप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गोकुळ पॅटर्न राबवावा व संघाच्या सर्व सेवा सुविधा द्याव्‍यात असे मागण्‍या सिंधुदुर्ग जिल्‍हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केल्‍या.
     यावेळी चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला आमचे नेहमी सहकार्य राहील. संघाची वासरू संगोपन योजना,व म्हैस खरेदी योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्तीत शेतकर्यांच्या पर्यंत पोहचवणेचे काम करू यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध वाढीसाठी मदत होईल व आपण सुचवलेल्या पर्यायाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून आपल्याला वेळोवेळी सहकार्य करू,असे आश्वासन दिले व आभार संचालक बयाजी शेळके यांनी मानले.
     यावेळी सिंधुदुर्ग जिल्‍हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत, सिंधुदुर्ग दूध संघाचे अध्‍यक्ष एम.के. गावडे, गोकुळचे जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, नुतन कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी, सिंधुदुर्ग बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!