गोकुळच्यावतीने बाजीराव खाडे यांचा सत्कार


कोल्हापूर • प्रतिनिधी
     काँग्रेसचे उत्तरप्रदेश प्रभारी व महाराष्‍ट्र काँग्रेसच्‍या पार्लमेंटरी बोर्डाच्‍या सदस्‍यपदी निवड झाल्‍याबद्दल    सांगरुळ (ता.करवीर) येथील बाजीराव नानू खाडे यांचा गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट, अनेक उद्योगधंदे बंद पडले असतानासुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्‍यवस्‍था सुयोग्य पद्धतीने चालू ठेवून आपण वेगळा ठसा उमटवला व जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना आधार दिला असे उद्गार सत्कारप्रसंगी बाजीराव खाडे यांनी काढले.
     यावेळी बाजीराव खाडे यांच्यासह भातपीक स्‍पर्धेमध्‍ये राज्‍यात प्रथम क्रमांक पटकाविल्‍याबद्दल मलगोंडा सातगोंडा टेळे(रा.सुळकुड, ता. कागल) व इंटरनॅशनल शुटींग स्‍पोर्ट्स फेडरेशन आयोजित वर्ल्‍ड कपसाठी दिल्‍ली येथे निवड झाल्‍याबद्दल स्वप्‍नील सुरेश कुसाळे (रा.कांबळवाडी, ता. राधानगरी) यांचाही गोकुळच्यावतीने सत्‍कार करण्यात आला.
     यावेळी माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके,रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील, अरूण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्‍वास जाधव, संचालक धैर्यशील देसाई, दिपक पाटील, पी.डी.धुंदरे, उदय पाटील, अमरिशसिंह घाटगे, सत्‍यजीत पाटील, विलास कांबळे, संचालिका अनुराधा पाटील, बाबा देसाई, रामराज देसाई कुपेकर, कार्यकारी संचालक डी.व्‍ही. घाणेकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *