कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चा ५९ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी संघाच्या ताराबाई पार्क येथे चेअरमन विश्वास पाटील व संचालकस यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. गोकुळ प्रकल्प येथे सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले होते. चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि संचालकांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. तसेच संघाच्या विविध ठिकाणी असणाऱ्या दूध शितकरण केंद्रावरही वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघाची स्थापना १६ मार्च १९६३ रोजी ७०० लिटर दूध संकलनावर झाली. आज ७०० लिटरवरुन प्रतिदिनी जवळपास १५ लाख लिटर दूध संकलन होत आहे. या सर्व गोकुळच्या जडणघडणीमध्ये स्व.आनंदराव पाटील – चुयेकर व संघाचे आजी-माजी चेअरमन, संचालक, अधिकारी, कर्मचारी, गोकुळचा कणा असलेले गोकुळचे लाखो दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, संघ कर्मचारी व वाहतूक ठेकेदार व हितचिंतक यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच संचालक मंडळ व आमचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्यामुळेच गोकुळ २० लाख लिटरचे उद्दिष्ट ठ साध्य करेल असा विश्वास संघाचे चेअरमन विश्वास पाटील याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी त्यांनी गोकुळचे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक , कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व हितचिंतक यांना गोकुळ वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संघाचे चेअरमन विश्वास पाटील, जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील – चुयेकर, किसन चौगले, रणजीतसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.