गोकुळचे चेअरमन धावले दूध उत्‍पादकाच्‍या मदतीला

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     गोकुळ संलग्‍न श्री पांडूरंग सहकारी दूध व्‍याव. संस्‍था.,मर्या. खेबवडे, ता. करवीर, संस्‍थेचे दूध उत्‍पादक दिनकर बळवंत पाटील (रा. खेबवडे, ता. करवीर) यांचे अतिवृष्‍टीमुळे घर व गोठयाची पडझड झाली. यामध्‍ये गाभण तीन जनावरे अतिगंभीर जखमी झाले आहेत. त्‍यात त्‍यांचे अंदाजे दोन ते तीन लाख रूपये इतके नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती मिळताच गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी तात्‍काळ संघाच्‍या चुये सेंटरकडील डॉक्‍टरांच्‍याकडून जनावरांवर उपचार करण्‍याच्‍या सुचना दिल्या व प्रत्यक्ष पाटील कुटुंबियांची भेट घेवून त्‍यांचे सांत्‍वन केले.  दूध संघाशी संलग्न सर्व दूध उत्पादकांनी संघाची किसान विमा पॉलिसी करावी यामुळे येणाऱ्या आर्थिक संकटाला तोंड देता येईल. असा सुचना त्यांनी केल्या.
      यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, खेबवडेचे उप.सरपंच सुयोग वाडकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!