महानंदाला आर्थिकदृष्‍टया भक्कम करण्यासाठी गोकुळचा हातभार


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची मुंबई येथील दररोजची सरासरी प्रतिदिन दूध विक्री ७ लाख लिटरपेक्षा जास्त असून संघाच्या वाशी येथील डेअरीमधून प्रतिदिन ५ लाख लिटर पॅकिंग होते व ३ लाख लिटर पॅकिंग हे इग्लू डेअरी सर्व्हिसेस या खाजगी कंपनीकडून सध्‍या प्रती लिटर १ रूपये ६० पैसे या दराने पॅकिंग करून घेतले जात होते. सदर कराराची मुदत ३१/०५/२०२१ पर्यंत होती. करार नुतनीकरण करण्‍यासाठी त्‍यांनी ९ टक्‍के (प्रतिलिटर ०.१४ पैसे)दरवाढीची मागणी केली होती. सदर दरवाढ अवास्‍तव असल्‍याने याबाबत संघास कमीत कमी दरामध्‍ये पॅकिंग करून देण्‍याबाबत ते तयार झाले नाहीत.
     राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे गृह राज्यमंत्री  सतेज पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखालील ३० वर्षानंतर सत्तांतर झाल्‍याने व दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना जास्‍तीत जास्‍त मोबदला मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने काटकसरीचे धोरण अवलंबण्‍यात आले व याचा सारासार विचार करून सहकार वृध्‍दींगत होण्‍यासाठी व सहकार तत्‍वावर चालत असलेल्‍या महानंदा या महासंघास आर्थिकदृष्‍टया भक्कम करण्यासाठी हातभार लावण्यासाठी गोकुळच्‍या सहभागाची आवश्‍यकता असल्‍याने व त्‍यांना मदत करण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील या दोघांनी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील(आबाजी) व महानंदाचे चेअरमन रणजित देशमुख यांच्याबरोबर चर्चा करून सदर संघाना परस्‍पर सहकार्य करण्‍याचा सल्‍ला दिला.
     त्‍याप्रमाणे संचालक मंडळाच्‍या ठरल्‍याप्रमाणे गोकुळ संघाचे महानंदा गोरेगाव या दुग्‍ध्‍शाळेत प्रती लिटर १ रूपये ५५ पैसे या दराने पॉकिंग करून घेण्‍याचा ठराव एकमताने झाला. यामुळे गोकुळ दूध संघाचे प्रति लिटर १४ पैसे बचत होऊन वार्षिक १ कोटी ५५ लाखची बचत होणार आहे. तसेच अतिरिक्त रोजंदारी नोकर कपात ३ कोटी १२ लाख वार्षिक बचत होणार आहे. व मुंबई, पुणे टँकर वा‍हतूक ०.१७ पैसे कपातीमुळे ५ कोटी ३२ लाख वार्षिक बचत होणार आहे. यामुळे दूध उत्पादकास जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी हातभार लागणार आहे. असे राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.  
     तसेच दुग्धव्यवसायच्या वाढीच्या उद्देशाने गोकुळ व महानंदा यापुढे भविष्यात एकत्रित काम करणार असे राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील  म्हणाले.
      आज दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्‍या दालनामध्‍ये सदर करार पत्रावर स्वाक्षरी  झाल्‍या असून त्‍याचे अधानप्रधान कार्यक्रम दुग्धविकास मंत्री  सुनिल केदार, राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्‍यासमोर झाला.
     यावेळी गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील(आबाजी), महानंदाचे चेअरमन रणजित देशमुख, गोकुळचे संचालक अरूण डोंगळे, महानंदा व्‍हा. चेअरमन  डी.के. पाटील, महानंदाचे कार्यकारी संचालक श्‍याम सुंदर पाटील, गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर तसेच गोकुळ व महानंदाचे अधिकारी उपस्थितीत होते.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *