गोकुळच्‍या तज्ञ व शासन नियुक्‍त संचालकांचा सत्कार

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
      कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्‍या मिटींगमध्‍ये तज्ञ संचालकपदी युवराज दत्ताजीराव पाटील, विजयसिंह कृष्णाजी मोरे यांची तर शासन नियुक्त संचालक म्हणून मुरलीधर रघुनाथ जाधव यांची नेमणूक झाल्‍याबद्दल चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
      याप्रसंगी संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!