जुन्नर येथे गोकुळचे दूध व दुग्धउत्पादने उपलब्ध

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नर येथे त्रिमूर्ती एजन्सीज यांच्या सहकार्याने पहिल्या गोकुळ दूध संघाच्या शॉपीचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांच्या हस्ते झाले.
     यावेळी चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जन्‍मस्‍थळी शिवनेरी किल्‍लाच्‍या पायत्थाशी संघाच्‍या पहिल्‍या शॉपीचे उद्घाटन करता आले याचा मला व माझ्या गोकुळ परिवाराला अभिमानास्पद आहे. तसेच गोकुळ या बोधचिन्‍हाचा अतिशय मोठा बोलबाला असून तो सर्वांच्‍या आवडीचा ब्रॅंड आहे. कारण संघाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थ त्‍यामध्ये जीभेस हवी–हवीशी वाटणारी मधूर चव आहे. अतिउच्‍च प्रतिची शुध्‍दता आहे. शिवाय गोकुळ दूध इतर कोणत्‍याही दूधापेक्षा गुणवत्‍तेमध्‍ये श्रेष्‍ठ आहे. हे महाराष्‍ट्रातील ग्राहकांच्या पसंतीने सिध्‍द झाले आहे. याकरीता जुन्नर तालुक्यातील लोकांना गोकुळची विविध दर्जेदार उत्पादने उपलब्ध व्हावीत आणि उत्पादनाचा आस्वाद घेता यावा याकरिता नवी शॉपी निर्माण केली आहे. या शॉपीमध्ये दूध, श्रीखंड, आंबाश्रीखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी, दूध पावडर इत्यादी पदार्थ उपलब्ध असणार आहेत. भविष्‍यात गोकुळ पुणे ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामस्‍थानी सहकार्य केले तर दूध संकलनाची व्‍यवस्‍था करून व शेतकऱ्यांचे हित जोपासण्‍याचे काम गोकुळ परिवार करेल.
     माजी पंचायत समिती सदस्‍य बाजीराव ढोले यांनी गोकुळने दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थ उपलब्ध करून दिल्‍याबद्दल संघाचे आभार मानले. चेअरमन विश्वास पाटील यांनी दूध संकलन चालू करण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला, त्‍याबद्दल संघास मदत करण्याचे आश्वासन दिले.
      यावेळी कुमार गोडकर, धनराज खोत, दिपेशसिंह परदेशी, शिवा डोंगरे, गोकुळ दूध संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!