रायगडावरील उत्खननामध्ये मिळाली सोन्याची बांगडी

रायगडावरील उत्खननामध्ये मिळाली सोन्याची बांगडी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याची बांगडी मिळाली आहे.
     दरम्यान,  युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज रायगडास भेट देऊन उत्खननात मिळालेल्या या ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली. यावेळी पुरातत्त्व विभागाने केलेल्या या कामगिरीबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
     प्राधिकरणामार्फत गडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याची मौल्यवान बांगडी मिळालेली आहे. अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. तसेच या वस्तू ज्याठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणाचे वास्तविक ऐतिहासिक महत्त्व व माहिती समजण्यास मोलाची मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *